संवेदनशील व्यक्ती प्रेमाचा आणि मायेचा भूकेला असतो. या दोनच गोष्टींची अपेक्षा त्याला समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षित असते. बाकी त्याच्यासाठी सर्वकाही मोहमाया आहे. त्याला या दोनच गोष्टी देता येतात किंवा घेता येतात. प्रेम आणि माया ही संवेदनशील व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये समजली जातात. संवेदनशीलता हि मानवांच्या वस्तीला नाही तर देवाच्या गाभाऱ्यात अनुभवायला मिळते जिथे प्रेम, माया, विश्वास, आपलेपणा व काळजी यांचा निस्वार्थ सहवास नकळत तुम्हाला कस्तुरीच्या अत्तरासवे स्पर्शून जाईल. फक्त अट एवढीच आहे तो सुगंधित स्पर्श तुमच्या सवे तुमच्या बरोबर गाभाऱ्याच्या बाहेर ही यायला हवा आणि तो जेव्हा तुमच्या सवे येईल तेव्हा तुम्ही माणूस म्हणून स्वतःला अनुभवायला शिकाल. ©Dhananjay(dhanuj) Sankpal #संवेदनशीलता