कविता म्हणजे.... अस्तित्व...एका मनाचे,अव्यक्त भावनांचे अंतरंग शब्दांचे,द्वंद्व विचारांचे कविता म्हणजे गुज सुख आणि दुःखाच्या व्यक्त होण्याचे तरल भावनांना वाट करून देण्याचे कविता म्हणजे स्वप्न जिवाचे, विश्व अनुभवांचे वास्तविक आणी अवास्तविक कल्पनांचे कविता म्हणजे मैत्र जीवाचे,घट्ट नाते मनाचे कविता म्हणजे फलित प्रसव कळांचे नवनिर्मिती च्या आनंदाचे.... सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय हा तुमचा आणि आमचा जिवाभावाचा विषय आहे. कविता म्हणजे.. #कविताम्हणजे1 माझ्यासाठी तर माझा जीव,माझं प्रेम आहे. चला तर मग आज या विषयावर लिहुया. हा विषय Suhas M. More यांचा आहे.