रम्य ते बालपण कधी इकडे कधी तिकडे भिरभिरणारे मन, कधी दुखी कधी आनंदी कधी मजेचे क्षण. असंच लहानपण आज येऊन गेल मनात, रमून गेलो कसं आलंच नाही ध्यानात. रम्य ते बालपण रम्य त्या आठवणी, सुंदर माझं गाव येऊन गेल मनी. लहानपणीचे विविध खेळ मोकळा असायचा वेळ, कोणी बनायचं धोनी,कोणी बनायचं गेल. खेळायचो क्रिकेट,लगोरी,विटीदांडू, लोक म्हणायचे पोरांनो नका तुम्ही भांडू. कधी जायचो जांभळांना, कधी जायचो बोरांना, काजू-आंबे भरपूर आवडत असत पोरांना. जिथे असायची धमाल मस्ती ती आमची शाळा, खेळ असो अभ्यास सगळे व्हायचो गोळा. मुलगा-मुलगी,धर्म -जात नव्हता भेदभाव. शाळेतील गुणी मुले म्हणत असायचं गाव. टायर चालवणे,पोहायला जाणे नेहमीचेच आमचे उद्योग, गोटया खेळणे, पत्ते खेळण्याचा होता वेगळाच रोग. कधी जायची सहल कधी वनभोजन, वाट पाहायचो आम्ही कधी येतात सण. आता मात्र चित्र बदललं आहे सारं, लोकांच्या कानात शिरलंय पैशाच वारं. आता मात्र कोणाकडे राहिला नाही वेळ, लहानमुले गेम्समुळे विसरलेत आता खेळ. असे होते माझे रम्य ते बालपण, पुन्हा-पुन्हा तिकडेच घेऊन जाते मन. - हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #childhood #childhood_memories #बालपण #Life_experience