Nojoto: Largest Storytelling Platform

°मज लागो देवा° मज लागो देवा । सेवेचिये गोडी । गा

°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...
°मज लागो देवा° 

मज लागो देवा । सेवेचिये गोडी ।
गाईन आवडी । तुझे नाम ॥ 
गोड तुझे नाम । असो माझे ओठी ।
आशीर्वाद पाठी । असू द्यावा ॥ 
भवातूनी मज । तूच आता सोड ।
लागू दे रे ओढ । हरी नाम ॥ 
कैवल्याचा राणा । जरी ना भेटला ।
तरही साठला । भक्तिभाव ॥ 
अंतरित ध्यान । रोज करताहे ।
तुज पाहताहे । दाही दिशा ॥ 
भवातून मुक्ती । तूच दे रे आता ।
तूचि असे दाता । पामरांचा ॥ 
भक्ती भाव माझ्या । भरलाहे मनी ।
तूचि ध्यानी मनी । सदा असे ॥ 
मनोभावे रोज । करताहे सेवा ।
रोज तुझी देवा । पांडुरंगा ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
          9892800137

©Devanand Jadhav अभंग - मज लागो देवा सेवेचिये गोडी...