_#कवी'धनूज. तू... तू... हवीयेस तू... हवीयेस हसण्यासाठी ओघळणारे अश्रू समजण्यासाठी धकधक ह्रदयाची का फक्त तुझ्यासाठी तुझ्या भोवतालीच्या माझ्या मनाला स्थिरता लाभण्यासाठी तू... हवीयेस तू... हवीयेस मनमुराद रूसण्यासाठी सुख-दु:खांचा हळुवारपणा जपण्यासाठी संसार हा सार तुझ्याभोवती अंगणी तुळस हळद'कुंकवासाठी तू... हवीयेस तू... हवीयेस कवीच्या लेखणीसाठी #श्वेत'धनूच्या सप्त रंगासाठी चंद्रतारे तोडण्यासाठी पुन्हा एकदा ताजमहल विणन्यासाठी तू... तू हवीयेस जन्मोजन्मीच्या वचनासाठी तू... तू... हवीयेस -लेखक'कवी- (धनंजय संकपाळ) #धनूज | रंग मनाचे. #तू हवीयेस