काल होता जिथे गजबजाट तीच झाली आज अबोल वाट ज्या वाटेवरती तू धरलास माझा हात त्याच वाटेवरती केलेस मला अनाथ ज्या वाटेवरती उमटले आपल्या पावलांचे ठसे तीच वाट आज अनोळखी दिसत असे ज्या वाटेवरिल वृक्ष आपल्या प्रेमाची साक्ष देती तीच वाट आज मज का नवीन भासती त्या वाटेनेही आज तुझ्यागत धरला अबोला तू दूर गेलास मी मात्र उभी त्याच वाटेला ....... शुभ संध्या मित्रहो आताचा विषष आहे अबोल वाट.. #अबोलवाट हा विषय Bhanaji Chavan यांचा आहे. चला तर मग लिहुया.