भाग-1 चंद्र एका चांदनीच्या प्रेमात पडला होता मिठीत घेता तिला तोही रडला होता बघून प्रेम चंद्राचे चांदणी हळहळली वेदना तिच्या मनातील गालावरती ओघळली चंद्र आणि चांदणीची भेट ती क्षणभंगूर दुरावयाच्या भीतीने दोघांच्या मनी हुरहूर दूर होता चंद्राचे डोळे होते पाणावले रूप त्या चांदणीचे डोळ्यात त्याने सामावले जाता जाता चंद्र मात्र काळीज स्वतःचे ठेऊन गेला नकळत चांदणीचे काळीज तो घेऊन गेला विरहाच्या वादळात चंद्र ढगाआड लपला त्यांच्या प्रेम कहाणीचा पहिला भाग संपला शब्दसंगिनी शुभ संध्या मित्रहो सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... आताचा विषय आहे चंद्र आणि चांदणे. .. #चंद्रआणिचांदणे #collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine