Nojoto: Largest Storytelling Platform

तू सोडून गेली तेंव्हा जखमांचा पाऊस होता वेदनांचा स

तू सोडून गेली तेंव्हा
जखमांचा पाऊस होता
वेदनांचा सुसाट वारा
जणू दंश विषाचा होता..१

घाव सावरण्या असे मनाचे
मलामांना हातचं नव्हते
एकाकी पडलो होतो
मज अपुले कुणीच नव्हते..२

वीज परकी होती तरीही
आकांत करुनी गेली
घायाळ काळजाचा या
ती आवाज सांगूनी गेली...३

नभ फाटून गेले होते
या फाटलेल्या हृदयासाठी
रक्तात नाहलो सजनीं
मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४

जव जखमांचा पाऊस स्थिरतो
ह्रुदयातून तो दरवळतो
विरहाचा गंध असातो
त्या सरणावर जाऊन जळतो..५
कवी अविनाश... तू  सोडून गेली तेंव्हा...
तू सोडून गेली तेंव्हा
जखमांचा पाऊस होता
वेदनांचा सुसाट वारा
जणू दंश विषाचा होता..१

घाव सावरण्या असे मनाचे
मलामांना हातचं नव्हते
एकाकी पडलो होतो
मज अपुले कुणीच नव्हते..२

वीज परकी होती तरीही
आकांत करुनी गेली
घायाळ काळजाचा या
ती आवाज सांगूनी गेली...३

नभ फाटून गेले होते
या फाटलेल्या हृदयासाठी
रक्तात नाहलो सजनीं
मी तू दिलेल्या अश्रूंसाठी..४

जव जखमांचा पाऊस स्थिरतो
ह्रुदयातून तो दरवळतो
विरहाचा गंध असातो
त्या सरणावर जाऊन जळतो..५
कवी अविनाश... तू  सोडून गेली तेंव्हा...

तू सोडून गेली तेंव्हा...