Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्य

आयुष्य कस असाव तर उगवत्या सुर्यासारख असाव.जस सुर्याला अभिवादन करण्यासाठी अंगणात रांगोळ्या घातलेल्या असतात.उषेच दार उघडलेल असत.गोठ्यामधे धेनू आपल्या पाडसाला भेटण्यासाठी हंबरत असते.सुगंधीत वारा हा सर्व वृक्षवेलींना स्पर्श करत जाग करत असतो.दवबिंदू हे वेलीवर मोत्याप्रमाणे सजलेले असतात.
भाट बनून विहंग कुंजारव करतात.आयुष्याची सकाळ ही अशी नवचैतन्याने भरलेली असावी.ना राग ना लोभ.सगळ कस सुंदर,सात्विक, निष्पाप आणि मुख्य म्हणजे आपल आचरण,आपल मन हे शुध्द असाव..अगदी निरागस बालकासारख..... #मराठी  कविता