Nojoto: Largest Storytelling Platform

#थेंब मातीचा सुवास पेटलायं, अंगणी पाऊस पडलायं.. ए

#थेंब
मातीचा सुवास पेटलायं, 
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याचा पाऊस, धरेस आधार,
माझा पाऊस, मलाच भार..
एक पाणी, पडून गोड धार,
एक पाणी, पडून खारे क्षार..
कुठल्या धारेत भीजायचं  मी,
कि अंग क्षारेत सुखवायचं मी..
सांग मला सत्वर, प्रश्नाचं ह्या उत्तर..
थेंब अजून उदास पडलायं,
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याचं बरसणं, बूलंद दणक्यात,
माझं बरसणं, मंद हुंदक्यात..
त्याच्या संगे विजेची लय कडकडणारी,
माझ्या संगे मनाची सय तडफडणारी.. 
त्याचं कोसळनं, पूराचे पाट,
माझ्या पूराची, छोटीशी वाट..
त्याच्या सप्तरंगाचा, नभी मुक्तछंदाचा..
इंद्रधनु तो झकास पडलायं..
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याच्या गाण्यांत, चिवचिवाट वणातला,
माझ्या गाण्यांत, शुकशुकाट मनातला..
त्याचं संगीत, जणु सुरांचा मळा,
माझा येथ, अजून कोरडा गळा..
खुलवेल कळी, कोण जाणे कोण वेळी..
प्रत्येक थेंब खास पडलायं,
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..
मातीचा सुवास पेटलायं, 
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..                              :- "फाल्गुन." #leaf
#थेंब
मातीचा सुवास पेटलायं, 
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याचा पाऊस, धरेस आधार,
माझा पाऊस, मलाच भार..
एक पाणी, पडून गोड धार,
एक पाणी, पडून खारे क्षार..
कुठल्या धारेत भीजायचं  मी,
कि अंग क्षारेत सुखवायचं मी..
सांग मला सत्वर, प्रश्नाचं ह्या उत्तर..
थेंब अजून उदास पडलायं,
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याचं बरसणं, बूलंद दणक्यात,
माझं बरसणं, मंद हुंदक्यात..
त्याच्या संगे विजेची लय कडकडणारी,
माझ्या संगे मनाची सय तडफडणारी.. 
त्याचं कोसळनं, पूराचे पाट,
माझ्या पूराची, छोटीशी वाट..
त्याच्या सप्तरंगाचा, नभी मुक्तछंदाचा..
इंद्रधनु तो झकास पडलायं..
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..

त्याच्या गाण्यांत, चिवचिवाट वणातला,
माझ्या गाण्यांत, शुकशुकाट मनातला..
त्याचं संगीत, जणु सुरांचा मळा,
माझा येथ, अजून कोरडा गळा..
खुलवेल कळी, कोण जाणे कोण वेळी..
प्रत्येक थेंब खास पडलायं,
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..
मातीचा सुवास पेटलायं, 
अंगणी पाऊस पडलायं..
एक तो गगनातला..
एक हा नयनातला..                              :- "फाल्गुन." #leaf