White "हे असलं प्रेम वगैरे नसतं" असं ऐकलंय आजवर खूप, पण त्यांनी कुठे पाहिलंय आपल्या नात्याचं हे रूप? 'तू माझा कोण?' यावर लिहिलंय खूप काही, पण सर्वांना शब्दामागाचे अर्थ उमगतातंच असं नाही. म्हणून दाखवते तुलाच, माझ्या नाजूक या कविता... लिहितेही फक्त तुलाच, गाजावाजा न करता. अजून काय हवं असतं आनंदाने जगण्यासाठी? लिहावं तर असं मनसोक्त, एकाच व्यक्तीसाठी! जी दूर राहत असली तरी मनात घर करते... तिचं असणंच एक कविता, जी कधी न मिटते! ©Anagha Ukaskar #rajdhani_night #Nojoto #nojotomarathi