Nojoto: Largest Storytelling Platform

,सत्याची पाऊलवाट!!! भेदारली गेलीयेत मनं विचार क्

,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...
,सत्याची  पाऊलवाट!!!

भेदारली गेलीयेत मनं
विचार क्षमता शुन्य झालीये
भार ठेऊनी दगडी पाषानावर
नेहमी दोष देती माणसं नशीबावर..!!

पिढीजात अठराविश्वे दारिद्र्य
कर्माविना हटेल तरी कसे
कौल लावून पाषाण दगडाला
तो स्वताच नशीब अजमावत असे..!!

द्वेष ,अंहकार ,मी पणा
जणु त्याच्या पाचवीलाच पुजलेला
माणसावाणी माणूस पाहतो मी
दगडांसमोर नतमस्तक झालेला..!!

येईल त्या संकटावर मात करून
भेदत जाईल जेंव्हा तो दुःखाला
तेंव्हाच त्याला दिसू लागेल अन्
स्पर्श करेल तो सुंदर यशाला..!!

का म्हणून षंडासारखं 
दगडांसमोर हात जोडायचं
करावचं वाटला नमस्कार तर
जन्मदात्या समोर दंडवत घालायचं..!!

क्षणभर दुखासाठी स्वताच्या 
आयुष्याचा शेवट का म्हणून करायचं
मिळेल तेथून ही मार्ग माणसाला फक्त विवेक जागा करून सत्याची पाऊलवाट चालायचं..!

©®आयु.एस.टी.धम्मदिक्षीत.
        ९६११२५३४४१. सत्याची पाऊलवाट...

सत्याची पाऊलवाट...