Nojoto: Largest Storytelling Platform

आत्ता पावसाळा येईल मन पुन्हा ओलं होईल छत्री उघडू उ

आत्ता पावसाळा येईल
मन पुन्हा ओलं होईल
छत्री उघडू उघडू म्हणता
चिंब चिंब होऊन जाईल

कुणी तरी पावसा कडे
डोळे लाउन पहातंय
मळभ दाटल्या डोळ्यांचं
मन मात्र गातय

पाउस कधी मुसळधार
पाउस कधी रिपरीप
पाउस कधी संततधार
पाउस कधी चिडीचीप

आभाळभर डोळे आता
शोधत आहेत पाउस
कुणालाच दिसत नाही
पापण्यांमधला पाउस

©Krupali Ambone
  हवा हवासा वाटणारा पाऊस

हवा हवासा वाटणारा पाऊस #Shayari

37 Views