#मावशी.. पदर मायेचा, सदर छायेचा, परका न होई, हा दर सयेचा.. लोचणांचा थेंब, तुझ्यासाठीच चिंब, दुसऱ्या रूपात असे, तू आईचं प्रतिबिंब.. हा नशिबाचा मसुदा, कि वासुदेवाचा सौदा..? असेल वेगळी देवकी, तू माझीच यशोदा.. ह्या जन्मी नसेल तुझं माझ्यात रक्त, येत्या जन्मी मात्र येईल मी पोटी तुझ्याच फक्त..! -फाल्गुन.. . ©FalgunWords #मावशी