माझे मत-- माझे विचार मित्रांनो, आपण इंद्रियाद्वारे जे जे शुध्द या अशुध्द स्वरूपात ग्रहण करतो, ते आपल्या अंतरमनात आत्मसात होते. त्यात जे शाश्वत आहे ते शाश्वत म्हणून आणि जे मिथ्य आहे ते मिथ्य म्हणूनच जाणवत. जेव्हा आपली दृष्टी स्वच्छ/ शुध्द नसते , तेव्हा जे अशाश्वत / मिथ्या आहे तेच शाश्वत वाटते आणि दृष्टी स्वच्छ झाली तर प्रत्येक गोष्टीचे खरे मुल्य उमगू लागते. तेव्हा जगण्यातल जे जे अशाश्वतहोत ते ते ओसरू लागत आणि निसर्गरूपी शाश्वताकडे आपल्या मनाची ओढ वाढून आपल्यात परमपूर्ण, अतुलनीय शांती उपजते. अॅड. सूर्यवंशी