Nojoto: Largest Storytelling Platform

शब्दांना सांगितल मी तुम्ही एकांताच रूप घ्या , आता

शब्दांना सांगितल मी 
तुम्ही एकांताच रूप घ्या ,
आता कवितेला माझ्या 
आकांत भिनसला आहे ।।१।।

गर्दीला माणसांच्या 
देईल अशा निशानी ,
जसा एकटेपणाचा 
मी श्वास सोसला आहे ।।२।।

वारीत पंढरीच्या 
संतापी टाळ हवा आता 
विद्रोही तुकोबांचा  
मज काळ भासला आहे ।।३।।

मोर्चात आरक्षणाच्या 
जातीवादी उभे सारे 
मौताज भिकारी भाकरीचा 
बेजात बसला आहे  ।।४।।

म्हणून म्हणतो कविते 
तू सांभाळ तोल शब्दांचा 
डोंगर हळव्या भावनांचा 
आज तुजवरती खसला आहे ।।५।।

- गोविंद अ. पोलाड
शब्दांना सांगितल मी 
तुम्ही एकांताच रूप घ्या ,
आता कवितेला माझ्या 
आकांत भिनसला आहे ।।१।।

गर्दीला माणसांच्या 
देईल अशा निशानी ,
जसा एकटेपणाचा 
मी श्वास सोसला आहे ।।२।।

वारीत पंढरीच्या 
संतापी टाळ हवा आता 
विद्रोही तुकोबांचा  
मज काळ भासला आहे ।।३।।

मोर्चात आरक्षणाच्या 
जातीवादी उभे सारे 
मौताज भिकारी भाकरीचा 
बेजात बसला आहे  ।।४।।

म्हणून म्हणतो कविते 
तू सांभाळ तोल शब्दांचा 
डोंगर हळव्या भावनांचा 
आज तुजवरती खसला आहे ।।५।।

- गोविंद अ. पोलाड