बस्स तुम्ही फक्त एकदा Success व्हा तुमच्याकडे बंगला, गाडी, नोकरी हे सगळं असेल तर तुम्हाला नाही म्हणणारे हो म्हणण्यासाठी प्रयत्न करतील.. व्यवसायासाठी भांडवल, वर्तमान पाहून लग्नासाठी नाही म्हणणारे, आज जे तुम्हाला जात, गरीब, रिकामा आहे असे बोलून नकार देणारे तेव्हा तुमच्या जवळ येतील.. कारण, त्यांना हरलेल्या व्यक्ती ची टीका, भूतकाळ आणि वर्तमान बघून समाजाचा विचार येतो आणि तुम्हाला सतत प्रत्येक गोष्टीत नकार च मिळतो, साधं, लग्नाचं घ्या - मुलगा जर चांगला यशस्वी Actor, Dancer, singer, government job, किंवा अशा कोणत्याही कलेत,सरकारी पदावर, राजकारणी किंवा कोणत्याही व्यावसायिक क्षेत्रात जर नावाजलेला असेल तर लग्नासाठी कोणतीच अट असणार नाही कारण, तुमच्याकडे ते सगळं असेल ज्याची गरज असते मुलींना किंवा त्यांच्या पालकांना त्यासाठी प्रेम ही करावं लागत नाही किंवा कुणाचे पाय धरावे लागत नाही सगळं येईल तुमच्या जवळ.. हे सगळं नसेल तर तुमचं 10 वर्षाचं प्रेम सुद्धा क्षणात धुळीस मिळेल. आणि ही आजची शोकांतीका आहे.. टीप :- सर्वच ह्या गोष्टींना Importance देत नाही तर काही अपवाद आहेत. कुणी प्रेम कुणी नातं तर कुणी नात्यांना महत्व देतात... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #LastNight