Nojoto: Largest Storytelling Platform

!! साजणी !! भावली ना साधी तुझी राहणी ही..। बंद डोळ

!! साजणी !!
भावली ना साधी तुझी राहणी ही..।
बंद डोळे ध्यानी मनी पाहणी ही..॥

कोण आहे ज्याणे अशी रास केली..।
खेचणारी काया जशी आखणी ही..॥

ये भिडू दे डोळे तुझे आज डोळ्यां..।
आडवी का येते सदा पापणी ही..॥

काव्य झाली सारी अदा शब्द गाणी..।
गीत माझे भासे कधी लावणी ही..॥

काय नाते सांगू नको या जगाला..।
जीव जातो भारी तुझी मागणी ही..॥

पीक डोलू हे लागले का करू मी..।
भूक मोठी खाऊ नये राखणी ही..॥

मी इथे हा तू वेगळी त्या किनारी ..।
हृदयाची झाली कशी वाटणी ही..॥

वेदनेला ‘संदीप’ तू नाव दे रे..।
औषधांची राणी बघा साजणी ही..॥ साजणी
!! साजणी !!
भावली ना साधी तुझी राहणी ही..।
बंद डोळे ध्यानी मनी पाहणी ही..॥

कोण आहे ज्याणे अशी रास केली..।
खेचणारी काया जशी आखणी ही..॥

ये भिडू दे डोळे तुझे आज डोळ्यां..।
आडवी का येते सदा पापणी ही..॥

काव्य झाली सारी अदा शब्द गाणी..।
गीत माझे भासे कधी लावणी ही..॥

काय नाते सांगू नको या जगाला..।
जीव जातो भारी तुझी मागणी ही..॥

पीक डोलू हे लागले का करू मी..।
भूक मोठी खाऊ नये राखणी ही..॥

मी इथे हा तू वेगळी त्या किनारी ..।
हृदयाची झाली कशी वाटणी ही..॥

वेदनेला ‘संदीप’ तू नाव दे रे..।
औषधांची राणी बघा साजणी ही..॥ साजणी