Nojoto: Largest Storytelling Platform

"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी, आठवल्या तुझ

"आज सहज बसलो होतो, त्या नदी च्या काठी,
आठवल्या तुझ्या नि माझ्या भेटी गाठी.

पाण्याचा बहाणा करून, कशी चोर पाउलांनी 
येत होतीस.
मी दिसताच, सोबत आणलेली घागर, रिकामीच
नेत होतीस.

तू शतदा केलास प्रयत्न, माझी वाट पाहण्याचा.
तू शतदा केलास प्रयत्न, माझ्या आधी येण्याचा.
प्रयत्न तुझा फसत असे,नदी काठी तुझ्या आधी
 मीच तुला दिसत असे.

राग ही तुझा किती देखणा असायचा 
माझ्या पायात रुतलेला काटा तुझ्या डोळ्यात सलायचा
सगळं चित्र डोळ्यासमोर स्पष्ट दिसत होतं आज
एकटाच होतो म्हणून नदी समोर वाटली थोडी लाज

तू  दिलेली रबराची अंगठी, अजूनही माझ्या, करंगळीत आहे.
सोनंचांदी,सगळं खोटं,हीच खरी संपत्ती माझ्या ओंजळीत आहे
आता कारणमीमांसा कशाला,होईल मोकळा, कधी हा श्वास
केव्हा तरी येईल दिवस तो,हीच एकमात्र  आस " एक आठवण रोजची

एक आठवण रोजची