एकदातरी वाटतं.. सहज मनात यावं अन मी सारं सारं बोलून टाकावं पण इतकंच वाटतं तेव्हा तू माझा हाथ घट्ट धरून थांबावं अगदी ओझं वाटलं ना की मी रडेन लहान बाळासवे तेव्हा तू बनून समीर त्या ओल्या अश्रूंना पुसावं मी निःशब्द असेन तेव्हाही तू मात्र आतल्या तुफानाला ओळखावं क्षणात हरवेन तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यातला मी शोधण्यासाठी अन मी हरवावं असं की पून्हा कधीच न सापडावं खांदा सुका होत जाईल तेव्हा मिठी सैल होत जाईल निघुयात म्हंटल्यानंतर तू मला अजून घट्ट धरावं खरंच वाटतं वर लिहलेलं सारं सारं एकदातरी सत्यात घडावं एकदातरी सत्यात घडावं सुरेश पवार #एकदातरी