Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे माझे ते नाते तुझे माझे ते नाते, नात्‍यात मां

तुझे माझे ते नाते

तुझे माझे ते नाते, नात्‍यात मांडू नको ।
झाली नाही भेट, विसर माझा पाडू नको ।।

मी पेरल्‍या ज्‍या आठवणी, तुझ्‍या हृदयात ।
चुकूनही कधी त्‍या, रागात खोडू नको ।।

जुडली कशीतरी, आपली जी नाळ ।
चुकूनही कधी ती, रागात तोडू नको ।।
 
आलीत तुफाने चोहीकडून कितीही ।
तरी साथ माझी तू, कधीही सोडू नको ।।

मी मेलो जरी कधी, भेट होण्‍याअगोदर ।
तू भेटली पहिलिंदा, तेथे येणे टाळू नको ।। तुझे माझे ते नाते
तुझे माझे ते नाते

तुझे माझे ते नाते, नात्‍यात मांडू नको ।
झाली नाही भेट, विसर माझा पाडू नको ।।

मी पेरल्‍या ज्‍या आठवणी, तुझ्‍या हृदयात ।
चुकूनही कधी त्‍या, रागात खोडू नको ।।

जुडली कशीतरी, आपली जी नाळ ।
चुकूनही कधी ती, रागात तोडू नको ।।
 
आलीत तुफाने चोहीकडून कितीही ।
तरी साथ माझी तू, कधीही सोडू नको ।।

मी मेलो जरी कधी, भेट होण्‍याअगोदर ।
तू भेटली पहिलिंदा, तेथे येणे टाळू नको ।। तुझे माझे ते नाते