सये सर पावसाची आली अवचित आज मृदूगंध शहारतो नव्या नवतीचा बाज थेंब टपोरी, बिलोरी घर ,आंगण भिजले नक्षी माळता मोत्यांचे देह तरुंचे सजले शीरशीर अलवार काटा फुटतो कोवळा बीजं रुजता मातीत सुखं स्वप्नांचा सोहळा देह, गात्रांत साठवं ओल मनांच्या तळाशी श्वास श्वासांत भारता लाट पारखी जळाशी मोर पिसारा फुलता डोळे भरले नभाचे शुभ्र कोंदण लाभले दान पावले मनाचे घेई भरून ओंजळ खोल भिजू दे पाऊस पाठशिवणीचा खेळ नको परत जाऊस ©Shankar Kamble #zindagikerang #पाऊस #पाऊसधारा #पाऊसाततुझीआठवण #पाऊसाला #सर #धारा #पाऊस_आणि_आठवण #पाऊसआला #पाऊस_आणि_प्रेम