हे हुंदके ही आता रुसूनी अबोल झाले डोळे भरून येताच अश्रूंचे शब्द झाले आसवे जरी माझ्या डोळ्यांतुनी निघाली होती तुझीच सारी लपवून ठेवलेली मी बघण्या तुलाच आलो जेव्हा तुझ्याच दारी कळलेच नाही केव्हा सोडून गाव आलो मग एकटेपणाची सोबत कमाल झाली मी एकट्यात रमलो माझाच मित्र झालो तरीही नाव ओठी आले तुझेच जेव्हा मी त्यास तुळस समजून अखेरचा निघालो स्वप्नील शांताराम जाधव २६-०७-२०२३ ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #eternal_love #feels_lonely