तुम्ही लावलेली ज्योत आजही प्रखर आहे ज्योती शिकल्या ज्योती बोलल्या ह्या त्याच ज्योती आहेत ज्या एकेकाळी अबला होत्या न्याय आम्हाला माहित नव्हता हक्क कोणता ठाऊक नव्हता जे जे येईल नशिबी तेच पिढ्यानपिढ्या मिरवत होतो अहंकार नव्हता ना स्वाभिमान मान नव्हता ना सन्मान..... पण शिक्षणाच दार तुम्ही उघडून खरी ताकद दाखवून दिली आजीवन ऋणी आहोत तुमच्या त्यागाला तुमच्या शौर्याला तळपती तलवारचं टोक म्हणजे स्त्री हिंमत ज्याने केली तिला छळण्याची तो भस्म झाल्याशिवाय राहणार नाही.... हक्काने जगतो फिरतो मिरवतो बोलतो ह्या सगळ्यांना वाचा फोडणारे हक्क न्याय देणारे हक्कदार तर तुम्हीच कधी न होवो परत फेड ऐसी किर्ती तुमची ❤️ ©SUREKHA THORAT #SavitribaiPhule