*न केलेल्या गुन्ह्याची रोज शिक्षा भोगतो मी* *देवून श्वास उसने मरणांस रोखतो मी* *सांगून गूज कानी अंधार पेटलेला* *चेतवू नको स्मशाने राखेत शोधतो मी* *डोळ्यांत दाटलेल्या सरी कैक शांत गहिऱ्या* *बरसू नको अवेळी वळीवास सांगतो मी* *संवाद साधण्याला प्रतिसाद सादास द्यावा* *भाषा अबोल आहे मौनास जाणतो मी* *मातीत पेरलेल्या अंकुरास धाप लागे* *तोडून नाळ ओली प्राणास शिंपतो मी* *पानांस गर्द हिरवा माखून साज रंग* *भाळी उदास रेषा कुंकास रेखतो मी* *लपेटून नशिबाच्या लक्तरात आयुष्याला* *दोष कोणता ?कुणाचा? कोड्यात गुंततो मी* *जपले उरांत त्यांनी कवटाळूनी घराला* *केल्या उभ्याच भिंती दगडांस भांडतो मी* ©Shankar Kamble #Travel #गझल #गझलेची #जीवन #माणूस #जीवन #अनुभव #धोका