Nojoto: Largest Storytelling Platform

जडपण डोक्यावर आपल्यांच्या प्रपंचाचे दडपण हृदयावर

जडपण डोक्यावर आपल्यांच्या प्रपंचाचे 
दडपण हृदयावर आपल्यांच्या भावनांचे
 सुखाच्या भावविभोर क्षणासाठी तयांच्या 
झिजलेला देह चालला लयाकडे ...

अति कठीण जीवन सुखाच्या प्रतीक्षेसाठी 
अति कणव रोपण सदैव आपल्यांच्या सुखासाठी 

मनाचं बांडगुळ जेव्हा रक्ताने विव्हळतो 
खपल्यांच्या स्त्रावाने गत तेव्हा स्मरतो 

आयुष्याच्या वळणावर रिक्त हाताने परतले 
सुखाच्या शोधात दुःखाला जीवनात रोपले 

वाटतयं...

 जगणं जर आपल्यांच्या सुखासाठी असेल
 तर हे जीवनही मजला सहर्ष प्रिय आहे. # Bhavna
जडपण डोक्यावर आपल्यांच्या प्रपंचाचे 
दडपण हृदयावर आपल्यांच्या भावनांचे
 सुखाच्या भावविभोर क्षणासाठी तयांच्या 
झिजलेला देह चालला लयाकडे ...

अति कठीण जीवन सुखाच्या प्रतीक्षेसाठी 
अति कणव रोपण सदैव आपल्यांच्या सुखासाठी 

मनाचं बांडगुळ जेव्हा रक्ताने विव्हळतो 
खपल्यांच्या स्त्रावाने गत तेव्हा स्मरतो 

आयुष्याच्या वळणावर रिक्त हाताने परतले 
सुखाच्या शोधात दुःखाला जीवनात रोपले 

वाटतयं...

 जगणं जर आपल्यांच्या सुखासाठी असेल
 तर हे जीवनही मजला सहर्ष प्रिय आहे. # Bhavna