Nojoto: Largest Storytelling Platform

व्यथा अधीर मनाची तुटलीत नातीगोती तुझ्या माझ्या जी

व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।। 

घट्ट अतूट बंधना
गेला विश्वासाला तडा, 
सुखी संसाराचा असा 
होता फुटला तो घडा।। 

विरहाच्या हुंदक्याने 
जीव नकोसाच केला, 
दोन जीवी ताटातूटी
परागंदा होत गेला।। 

कळलेना असे काही 
अघटित घडलयं, 
व्यथा अधीर मनाची 
दोहांमध्ये दडलंय।। 

आठवाणे त्रासवते 
जीव होतो कासावीस, 
तव् क्षणात जाऊनी 
मज तुचं भासावीस।।

©बी.सोनवणे उपक्रम
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय :- व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।।
व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।। 

घट्ट अतूट बंधना
गेला विश्वासाला तडा, 
सुखी संसाराचा असा 
होता फुटला तो घडा।। 

विरहाच्या हुंदक्याने 
जीव नकोसाच केला, 
दोन जीवी ताटातूटी
परागंदा होत गेला।। 

कळलेना असे काही 
अघटित घडलयं, 
व्यथा अधीर मनाची 
दोहांमध्ये दडलंय।। 

आठवाणे त्रासवते 
जीव होतो कासावीस, 
तव् क्षणात जाऊनी 
मज तुचं भासावीस।।

©बी.सोनवणे उपक्रम
अष्टाक्षरी काव्य रचना 
विषय :- व्यथा अधीर मनाची

तुटलीत नातीगोती
तुझ्या माझ्या जीवनाची, 
कशी मांडावी कळेना
व्यथा अधीर मनाची।।