Nojoto: Largest Storytelling Platform

आता तरी कुणाच्या यादीत का समावे दिलात नोंद नाही ह

आता तरी कुणाच्या यादीत का समावे 
दिलात नोंद नाही हसण्यात का फसावे

ध्येयाने आज माझ्या गावात झोपडी केली 
डोळ्यात झोप नाही तरी स्वप्नांनी का रुसावे

इतरांची बांधली मी जरी उंच उंच महाले
नावात अर्थ नाही मग कुणास का दिसावे 

नियतीवर प्रश्न झाले मी बोललोच नाही 
उरले जिथे न काही मग तिथेच का असावे

आताही भास देते तिचे रुसण्याचे बहाने 
मनास ओढ नाही मग मनात का हसावे 

बापाचा हात माझ्या बोटास साथ होता
घेण्या सहल आठवांची जत्रेने का नसावे

तिला भाळण्याचे जर नजरेवर आरोप होते
दिलाने यातनेला मग उगाच का सोसावे 

किती खोल गेलो आळ्यात या जगाच्या 
धोक्याने बुडवणारे खरच होते का विसावे

                      - गोविंद अनिल पोलाड
                           ( बेधुंदकार )
आता तरी कुणाच्या यादीत का समावे 
दिलात नोंद नाही हसण्यात का फसावे

ध्येयाने आज माझ्या गावात झोपडी केली 
डोळ्यात झोप नाही तरी स्वप्नांनी का रुसावे

इतरांची बांधली मी जरी उंच उंच महाले
नावात अर्थ नाही मग कुणास का दिसावे 

नियतीवर प्रश्न झाले मी बोललोच नाही 
उरले जिथे न काही मग तिथेच का असावे

आताही भास देते तिचे रुसण्याचे बहाने 
मनास ओढ नाही मग मनात का हसावे 

बापाचा हात माझ्या बोटास साथ होता
घेण्या सहल आठवांची जत्रेने का नसावे

तिला भाळण्याचे जर नजरेवर आरोप होते
दिलाने यातनेला मग उगाच का सोसावे 

किती खोल गेलो आळ्यात या जगाच्या 
धोक्याने बुडवणारे खरच होते का विसावे

                      - गोविंद अनिल पोलाड
                           ( बेधुंदकार )