नवे संकल्प नव्या आशा उजळू देत प्रगतीच्या दाही दिशा धार लेखणीला अशी यावी विचारांची शाई कधी ना सरावी शब्दफुले ताजी टवटवीत फुलावी काव्य बागेत कविता मनसोक्त बागडावी Rashmi प्रिय लेखक आणि लेखकानों💕 नवीन वर्षाच्या खुप खुप शुभेच्छा. हे वर्ष २०२१ तुमचा सुखाचा आणि भरभराटीचा जावो. मागच्या वर्षी आपण जाणलं कि लिखाण हे किती महत्त्वपुर्ण माध्यम आहे, स्वत:ला आणि जगाला ओळखण्यासाठी. काही लोकांनी या आधी कधी लिहीलं नव्हत तर काहीनी लिहायला सुरुवात केलेली पण त्याला नियमितता नव्हती. काही लोक लिहीत होते पण लिखाणाच्या काही गोष्टीं पासुन वंचित होते. आशा आहे तुम्ही सर्वांनी आमच्या मुळे काहींना-काही थोडी तरी प्रगती तर केलीच असेल. आज वर्षाचा पहिला दिवस