कधी हसून जगणं म्हणावं का? कधी रडून आपलं म्हणावं का? कुणीच नसतं कोणासारखं इथे कुणीच नसतं कोणाचं जगणं फक्त आपल्या मुठीत असतं, मुठीतलं जगणं हेच तर माणूस नावाचं बेट असतं! प्रश्नास उत्तर मिळावे हेच ध्येय त्या प्रश्नाचं असतं, माणसाने माणसासारखे जगावे हेच माणुसकीचं लक्षण असतं कधी तुझं कधी माझं असं म्हणताना माणूसपण उमगत असतं, माणसातलं माणूसपण हेच तर माणूस नावाचं बेट असतं! -: विलास भोईर :- माणूस नावाचं बेट!