Nojoto: Largest Storytelling Platform

बहरुनी आला मनी वसंत फुटे चैत्राची पालवी साद घाली

बहरुनी आला मनी वसंत
 फुटे चैत्राची पालवी
 साद घालीते वनी प्रियाला
 कोकिळा मी हळवी

नवं प्रेमाचे बीज अंकुरले 
नवा हर्ष हा मनी
ध्यास नवा हा, गंध नवा हा
 सुर नवे जीवनी

वैशाख सरला 
हर्ष हा भरला 
मेघ दाटले अंबरी 
आतुरली मनी वसुंधरा ती
 बरसूनी घेण्या उरी

इंद्रधनूची कमान पसरे  
फुले बहरली वनी 
स्वागत करण्या मज प्रियाचे 
हर्ष वाटे हा मनी

बरसूनी घे आता हवे तेवढे
प्रसन्न होऊदे जीवनी
आभाळ भरले मेघ पांघरले
तृप्त झाली अवनी
                       @राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय
बहरुनी आला मनी वसंत
 फुटे चैत्राची पालवी
 साद घालीते वनी प्रियाला
 कोकिळा मी हळवी

नवं प्रेमाचे बीज अंकुरले 
नवा हर्ष हा मनी
ध्यास नवा हा, गंध नवा हा
 सुर नवे जीवनी

वैशाख सरला 
हर्ष हा भरला 
मेघ दाटले अंबरी 
आतुरली मनी वसुंधरा ती
 बरसूनी घेण्या उरी

इंद्रधनूची कमान पसरे  
फुले बहरली वनी 
स्वागत करण्या मज प्रियाचे 
हर्ष वाटे हा मनी

बरसूनी घे आता हवे तेवढे
प्रसन्न होऊदे जीवनी
आभाळ भरले मेघ पांघरले
तृप्त झाली अवनी
                       @राजाराम कंटे जुनी सय
नवं वलय

जुनी सय नवं वलय