Nojoto: Largest Storytelling Platform

कसं सांगायचं तुला, येते कीती तुझी आठवण.. जन्मभरी च

कसं सांगायचं तुला, येते कीती तुझी आठवण..
जन्मभरी च्या क्षणांची, संपता संपे ना साठवण..

तुझ्यावीन माझी हसेल का पहाट..?
तुझ्यावीन माझी असेल का वाट..?
संधेला भास्कर जाईल का अस्त..?
निशा येईल का आकाशी घालत ताऱ्यांची गस्त..?
तुजपाशी माझा काळ ठेवलाय गहाण-गुंतवण..

मि जेव्हा कधी पापण्या मिटतो..
तुजसवेच्या क्षणांना भेटतो..
स्मरतो तुझे ते सारे हट्ट..
त्या आनंदात मिटणे डोळे तुझे घट्ट..
किती असायचं त्या हट्टांचं,
कसं सांगायचं माझ्यावर किती दडपण..

असतात सगळे अवती भवती,
त्यांच्यात असुनही मि एकटा असतो..
कुणा काही कळू नये म्हणून,
मिळून मिसळून बसतो..

गर्दीत त्यांच्या मि आजही कधी रमलोच नाही गं..
माझ्या इवल्याशा चिऊला मि आजही विसरलोच नाही गं..
खांदे देतील ते आळी-पाळी,
पण तुच करशील माझी पाठवण..

-फाल्गुन..

©FalgunWords #littlesister