Nojoto: Largest Storytelling Platform

घेते भरुन श्वासात स्पंदने तुझी मोरपिशी सोबत तुझी

घेते भरुन श्वासात
स्पंदने तुझी मोरपिशी 
सोबत तुझी असता 
बहकते मी जराशी

करु नको मनाई
मोहरल्या क्षणात
गच्च पावसाला या
थोपवू नको मनात

आरस्पानी सुखास
घे कवेत घट्ट रोखुनी
पुन्हा माहित नाही 
क्षण येतील का परतुनी

पुरे आता बहाणा 
 पडदा नको लाजेचा
घे उमजून तू राजा
इशारा या पावसाचा

©Sai Raj Mainkar
  मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

मराठी कविता.. पाऊस हवाहवासा ❤️

108 Views