Nojoto: Largest Storytelling Platform

"बैलपोळा" किंवा "बेंदुर " आजकाल च्या भाषेत सांगायच

"बैलपोळा" किंवा "बेंदुर "
आजकाल च्या भाषेत सांगायचे झाल तर "बैल डे" म्हणा हव तर. ह्याची किती excitement असायची हे शब्दांत सांगायचे आता तर खूप अवघड आहे. 2 बैल आमच्याही घरी होते. शेतकर्‍याची गाडी खरोखरच पार लावत ही बैल. पेरणीचा येवढा रगडा असतो की त्यांना खरोखर एक दिवस आराम तर दिलाच पाहिजे. किती प्रेम आणि काळजी असते त्यांची ही गोष्ट दाखवू तर नाही शकत पण व्यक्त करायला एक संधी असते. आदल्या रात्री पासूनच खर सुरुवात व्हायची खांदा मळण्यापासून. अरे दुसर्‍या दिवशी एकदम पहाटे पहाटे त्यांना शाही आंघोळ डोंगराकडेच्या तलावात. एक स्पेशल lifebuoy च्या साबणाने ते पन. पांढरी शुभ्र धुवून निघायची  जोडी एकदम. तिथून घरी गेल्यावर मात्र टेंशन की गोठ्यात खाली बसला तर परत कस धुणार ह्याच अंग खराब करून घेतले तर. मग त्यांची रंग रंगोटी. अंगावर उठवलेले छाप तर एकदम बघण्यासारखे असायचे. झूल अंगावर टाकल्या नंतर तर नाद खुळा. सगळ्यात राडेबाज भाग म्हणजे त्यांची मिरवणूक. प्रत्येक आळीची एक वेगळी शान असायची. त्याच्यावरून होणारी भांडणे पण मजेदार असायची. ह्या सगळ्यात 2 - 3 बेवडे असणारच अणि त्यांचा स्पेशल नागिन डान्स शिवाय तर मिरवणूक पूर्णच होवू शकत नाही. गावातील देवापुढे त्यांना बुजवण्यासाठी जी मजा होती ती काही औरच. ते सगळे झाल की एक फोटोग्राफी चा सेशन्स पण असायचा. ते फॅमिली फोटो खरे जबरदस्त होते. ती खरी complete फॅमिली होती.... लपंडाव

vikasyadav6723

Vikas Yadav

New Creator

लपंडाव #story