Nojoto: Largest Storytelling Platform

पंढरीच्या विठ्ठला एक म्हणणं ऐक ना यावेळी नाही जमलं

पंढरीच्या विठ्ठला एक म्हणणं ऐक ना
यावेळी नाही जमलं पंढरीला यायला
सांग तूच येशील का माझ्या भेटीला?
का कोणाला तरी पाठवशील न्यायला?

थकला बघ जीव माझा आता
विझल्या डोळ्यांना वाट दिसेनाशी झाली
आषाढी एकादशी काही क्षणांवर ठेपली
अन् क्षणोक्षणी आठवण तुझी मला आली

तुझ्या दिंड्या पालख्या बघतो मी जेव्हा
आतूरता तुझ्या ओढीची छळते मला
दुरूनच होतो नतमस्तक तुला अन्
तुझी अगाध किमया कळते मला


उभा जनसमुदाय लोटेल तुझ्या दर्शनाला
मी मात्र इथेच असेन अंथरुणाला खिळून
कर कठेवरी ठेवूनी अखंड समोर बघणारा तु
माझ्यासाठी एकदा पाहशील ना मागे वळून.

प्रयाग पवार

©prayag pawar #vithhal
पंढरीच्या विठ्ठला एक म्हणणं ऐक ना
यावेळी नाही जमलं पंढरीला यायला
सांग तूच येशील का माझ्या भेटीला?
का कोणाला तरी पाठवशील न्यायला?

थकला बघ जीव माझा आता
विझल्या डोळ्यांना वाट दिसेनाशी झाली
आषाढी एकादशी काही क्षणांवर ठेपली
अन् क्षणोक्षणी आठवण तुझी मला आली

तुझ्या दिंड्या पालख्या बघतो मी जेव्हा
आतूरता तुझ्या ओढीची छळते मला
दुरूनच होतो नतमस्तक तुला अन्
तुझी अगाध किमया कळते मला


उभा जनसमुदाय लोटेल तुझ्या दर्शनाला
मी मात्र इथेच असेन अंथरुणाला खिळून
कर कठेवरी ठेवूनी अखंड समोर बघणारा तु
माझ्यासाठी एकदा पाहशील ना मागे वळून.

प्रयाग पवार

©prayag pawar #vithhal