अनाथांची माई ------------------------------------------------------- भातुकलीच्या खेळातील वयी कोवळ्या पाठी संसाराचे ओझे लादले... कोणास सांगे ते दुःख माऊली बालपणी जे हृदय फाटले.... कांही दिसाचा संसार थोडका सुखी न तिच्या भाग्य लाभले सारे असुनी परी पोरकी अनाथ तिचे जीवन झाले तिजला पोटासाठी वाटेवरती वाटी नशिबी भटकण आले पाहुनी हाल त्या अनाथ मुलांचे हृदयी माईच्या वात्सल्य जागले अपार कष्ट झेलीत माई ने पोरख्यांना ही आपले केले भेद न व्हावा स्वतः हातून म्हणूनी स्वतःच्या बाळास वेगळे केले जगी न माई कोणी अनाथ राहिले जे न तुजला आई बोलले छायेत माई जे तुझ्या वाढले आज ते ही आणखी अनाथ झाले नजर लागली काळाची ही जणू ईश्वरास ही आज अनाथ भासले प्रेम तुझे माई घेण्यासाठी जसे देवाने ही तुज आज आई मानले.. ©yusuf sayyad #सिंधूताई_सपकाळ #Light