Nojoto: Largest Storytelling Platform

नको ना जाऊस कुठे.. सरेल ही रात्र काळी.. सोनेरी उगव

नको ना जाऊस कुठे..
सरेल ही रात्र काळी..
सोनेरी उगवतीला,
देऊ नवी झळाळी..

सोनेरी पुर्वेला बघ..
रंग किती उधाणलेले..
डोळ्यात साठवून घे..
आनंदाचे रंग ओले..

आनंदाने मांडव सजवू..
प्रीतीचा मोहर फुलेल..
आशेच्या गालावर,
गुलाबी लाली चढेल..

खचलीच कधी पावलं तर..
विसावा घे क्षणभर..
पुन्हा एकदा मनात,
नव्याने उमेद भर..

नको कोमेजून जाऊस..
पुन्हा नव्याने बहर..
साद घालेल तुला..
नव्या ऋतूचा मोहर..














©अर् #बहर..
नको ना जाऊस कुठे..
सरेल ही रात्र काळी..
सोनेरी उगवतीला,
देऊ नवी झळाळी..

सोनेरी पुर्वेला बघ..
रंग किती उधाणलेले..
डोळ्यात साठवून घे..
आनंदाचे रंग ओले..

आनंदाने मांडव सजवू..
प्रीतीचा मोहर फुलेल..
आशेच्या गालावर,
गुलाबी लाली चढेल..

खचलीच कधी पावलं तर..
विसावा घे क्षणभर..
पुन्हा एकदा मनात,
नव्याने उमेद भर..

नको कोमेजून जाऊस..
पुन्हा नव्याने बहर..
साद घालेल तुला..
नव्या ऋतूचा मोहर..














©अर् #बहर..