आधी कोणत्याही गावाला जायचं म्हंटल की, एक वेगळीच उत्सुकता असायची, ते मामाच असो किंवा मावशी च की, इतर कोणत्याही नातेवाईकाच्या गावाला असो. आणि त्यावर बऱ्याच कविता बालगीत तयार झाले. कारण, त्यावेळेसच्या सुट्ट्या घालवायला वेगळीच मज्जा यायची. जी आता कुठेतरी हरवली आहे. कारण, आता सगळे खूप व्यस्त झाले आहेत. आणि वेळ मिळालं तरी मोबाईल, टीव्ही मध्ये व्यस्त असतात. आणि ह्या विज्ञानयुगी जगात कुठंतरी बालपण आणि मोकळीक हरवली आहे. आता तर असंच म्हणावं लागेल -विडिओ कॉलिंग लावूया, मामाच्या गावाला पाहूया... कारण आताची हीच खरी बाब आहे. एकट-एकट राहून मुलांना नैराश्य येते. आणि ते एकलकोंडे होतात. हरवलं ते बालपण आणि आणि हरवली ती माणसे. आता फक्त रोबोट उरले. बरोबर ना.. (प्रीत ) हरवलं ते बालपण