Nojoto: Largest Storytelling Platform

Mind SMS quotes status messages सुख - दुःख....!

Mind SMS quotes status messages सुख - दुःख....! 

सुख आणि दुःख छुपी युती करून.. 
जीवनाची सत्ता चालवतात आलटून पालटून...
सुखाला निमंत्रण दुःखाच्या हातून...
हा डाव नियतीचा दोस्तहो घ्या समजून....!

सुखदुःखांची चुकवू नका गोळाबेरीज... 
जीवनात सुखाला नाही गोडी दुःखांखेरीज... 
दुःखाच्या मातीतंच रुजते सुखाचे बीज... 
सुखाच्या पावसात दुःख जणू चमचमती वीज...! 

आयुष्य हा एक असा बाजार... 
दुःखाला एक नाही सुखाला गिर्‍हाईक हजार... 
संकटं आणि आयुष्यातले चढउतार...
ह्या तर त्या किल्ल्या ज्या उघडतात समृध्दीचे द्वार...! 

कधीच खचून जावू नका होवून बेजार...
अल्पायुषी असतात अडचणीं.. मानू नका हार...
अडथळ्यांचा भवसिंधू करून पार...
सुखी समाधानी आयुष्याच्या ऐरावतावर व्हा स्वार....!

-संतोष लक्ष्मण जाधव. (९८९००६४००१) #सुख-दुःख..!
सुख - दुःख....! 