मी विझलो तेव्हां मी विझलो तेव्हां डोळे कायमचे बंद झाले होते कधीच दाटले नाही ज्या डोळ्यात पाणी आज तेही माझ्यासाठी वाहिले होते जिवंत होतो जेव्हां नव्हती किम्मत माझ्या जगण्याला आज मिटले डोळे कायमचे तर आले मला पाणी पाजायला दुःखाचे ढग दाटले होते जेव्हां तेव्हां सगळेच साथ सोडून गेले होते कधी ज्यांनी नाही दिला शब्दंचाही आधार आज तेच ओझे माझे खांद्यावर न्हेत होते फाटक्या आयुष्याला ठिगळं लाऊन जगलो आज आले मला नवीन कपडे घालाया कधी पाहिली नाही दिवाळी दसरा आज आले माझ्या देहाची होळी कराया - राशी ©Rashi मी विझलो तेव्हां #MarathiKavita #Death #deathpoem #RakeshShinde