Nojoto: Largest Storytelling Platform

मी विझलो तेव्हां मी विझलो तेव्हां डोळे कायमचे बं

मी विझलो तेव्हां


मी विझलो तेव्हां
डोळे कायमचे बंद झाले होते
कधीच दाटले नाही ज्या डोळ्यात पाणी
आज तेही माझ्यासाठी वाहिले होते

जिवंत होतो जेव्हां
नव्हती किम्मत माझ्या जगण्याला
आज मिटले डोळे कायमचे
तर आले मला पाणी पाजायला

दुःखाचे ढग दाटले होते जेव्हां
तेव्हां सगळेच साथ सोडून गेले होते
कधी ज्यांनी नाही दिला शब्दंचाही आधार
आज तेच ओझे माझे खांद्यावर न्हेत होते

फाटक्या आयुष्याला ठिगळं लाऊन जगलो
आज आले मला नवीन कपडे घालाया
कधी पाहिली नाही दिवाळी दसरा
आज आले माझ्या देहाची होळी कराया
                                   - राशी

©Rashi मी विझलो तेव्हां

#MarathiKavita #Death #deathpoem #RakeshShinde
मी विझलो तेव्हां


मी विझलो तेव्हां
डोळे कायमचे बंद झाले होते
कधीच दाटले नाही ज्या डोळ्यात पाणी
आज तेही माझ्यासाठी वाहिले होते

जिवंत होतो जेव्हां
नव्हती किम्मत माझ्या जगण्याला
आज मिटले डोळे कायमचे
तर आले मला पाणी पाजायला

दुःखाचे ढग दाटले होते जेव्हां
तेव्हां सगळेच साथ सोडून गेले होते
कधी ज्यांनी नाही दिला शब्दंचाही आधार
आज तेच ओझे माझे खांद्यावर न्हेत होते

फाटक्या आयुष्याला ठिगळं लाऊन जगलो
आज आले मला नवीन कपडे घालाया
कधी पाहिली नाही दिवाळी दसरा
आज आले माझ्या देहाची होळी कराया
                                   - राशी

©Rashi मी विझलो तेव्हां

#MarathiKavita #Death #deathpoem #RakeshShinde
rakeshshinde0428

Rashi

Growing Creator
streak icon49