अज्ञाताचा अंधारात अडकलेल्या मला अनोळखी झाले आता सारे ओळखीचे चाचपणाऱ्या हातातून निसटून जातो क्षण अन् उरतं मागे काळेकुट्ट आयुष्य सारी सारी रात्र... सर्वत्र साम्राज्य पसरवलेली... मला गुलाम बनवु पाहत्ये...सामावु पाहत्ये तिच्यात... मला बघवत नाहीये हा काळोख मिटून घेतलेत डोळे.... इथे सुद्धा आहे काळोख! बंद डोळ्यांना जरतारी नक्षी सुद्धा दिसू नये इतका तीव्र आहे हा काळोख उघडायचे का डोळे? मग होईल का उजेड? की ओढावून घेऊ कायमचा हा आताशा परिचीत झालेला काळोख???? ©Swapnil Shantaram Jadhav #Swapys_Diaries #Pennings #Night_Love #Poetry_Expressions