मनमिळाऊ, प्रेमळ, समजून घेणाऱ्या, सगळ्यांची काळजी करणाऱ्या स्पष्ट बोलणाऱ्या खऱ्या व्यक्ती ची खरंच किंमत नाही इथे, अशा लोकांना नेहमी च दुखावलं जातं त्रास दिलं जातं, नको ते बोललं जातं तरी ती व्यक्ती ते सगळं निमूटपणे ऐकून घेते कारण, त्यांना ते नातं महत्वाचं असतं... इथे मात्र लाथ मारणाऱ्यांना हात दिलं जातं कपटी आणि चुकीच्या लोभी लोकांना साथ दिलं जातं भुकेल्यांना तिरस्कार आणि पोट भरलेल्यांना भात दिलं जातं हे जग असंच आहे, प्रेमाला, प्रेमळ लोकांना किंमत नाहीच इथे चांगल्या लोकांना इथे नेहमीच त्रास दिलं जातं.. जात-पात, समाज, उच्च-निच्च,श्रीमंत-गरीब अशा दरीत प्रेमाचा बळी दिला जातो आणि अशा विचारसरणीमुळे नेहमीच खऱ्या लोकांचा बळी जातो.. छोटंसं जीवन आहे आपलं मात्र नको त्या गोष्टींवर माज केला जातो जिवंतपणी कोणाला कोणाची किंमत नाही इथे मेल्यावर मात्र प्रेतावर साज केला जातो.. ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) #JusticeForNikitaTomar