मला पडलेलं स्वप्नं... स्वप्नात आला माझ्या एक भयानक जिन, म्हणाला मला, तुला माहीत आहे चीन? मी विचारलं त्याला काय तुला म्हणु? तो म्हणाला मला, मी एक विषाणू-मी एक विषाणू.. म्हणाला मला, येतॊ तुझ्या भारतात, मी म्हणालो तुला खेचेन मी कोर्टात. म्हणाला बघ कसा येतॊ गर्दीतून, सर्वांपर्यंत पोहचेल मी खोकला, सर्दीतून. मी म्हणालो त्याला गप्प आता बस ! आमच्यकडे आहेत खूप साऱ्या लस. तो म्हणाला माझेपण मित्र आहेत खूप, अल्फा, बीटा, ग्यामा दाखवून देतील रूप. म्हणाला सगळ्या जगावर माझेच असेल राज्य, कोरोना एकूण आता राहतील सगळे सज्य. सगळीकडे फक्त माझेच असेल भय, न्यूज आणि पेपरमध्ये माझाच असेल विषय. मी म्हणालो आमची, करू आम्ही रक्षा. व्हॅक्सीन घेऊन करू, आता तुला शिक्षा. कोरोना म्हणाला येणार,नाही आता पुन्हा, नियम फक्त पाळायला, सांग तू त्यांना-सांग तू त्यांना... -हर्षल दत्तात्रय चौधरी ©Harsh #Dreams #स्वप्नं #corona #Mic