Nojoto: Largest Storytelling Platform

चिऊताई.. अगं अगं चिऊताई ये आमच्या घरी.. बाळ वाट प

चिऊताई..

अगं अगं चिऊताई
ये आमच्या घरी..
बाळ वाट पाहतंय
तुझी दारावरी..

चिऊताई तू घे
बाळाचा ग घास..
माझ्या तान्हूल्याला
तुझी लागली आस..

बाळ माझं इवलं
वाट तुझी पाही..
कानी येता किलबिल
कसं बावरून जाई..

तुझं दारावर येणं
जशी सुखाची झुळूक..
पान हलेना झाडाचं
वारा रुसला आपसूक..

चिऊताई आमच्या घरी
कर ना ग खोपा..
माझं तान्हं घेईन
तुझ्या बाळाचा पापा..

चिऊताई कशी गेली        copyright @kganesh
भुर्रकन उडून..              902811059
माझं बाळ दमलय
रडून रडून...! चिऊताई..
चिऊताई..

अगं अगं चिऊताई
ये आमच्या घरी..
बाळ वाट पाहतंय
तुझी दारावरी..

चिऊताई तू घे
बाळाचा ग घास..
माझ्या तान्हूल्याला
तुझी लागली आस..

बाळ माझं इवलं
वाट तुझी पाही..
कानी येता किलबिल
कसं बावरून जाई..

तुझं दारावर येणं
जशी सुखाची झुळूक..
पान हलेना झाडाचं
वारा रुसला आपसूक..

चिऊताई आमच्या घरी
कर ना ग खोपा..
माझं तान्हं घेईन
तुझ्या बाळाचा पापा..

चिऊताई कशी गेली        copyright @kganesh
भुर्रकन उडून..              902811059
माझं बाळ दमलय
रडून रडून...! चिऊताई..