Nojoto: Largest Storytelling Platform

फार महत्वाचं आहे माझ्यासाठी तुझं माझ्या आयुष्यात

फार महत्वाचं आहे माझ्यासाठी 
तुझं माझ्या आयुष्यात असणं 
तुझ्यासोबत असताना आवडतं मला 
तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं...

फार काही अपेक्षा नाहीत मला तुझ्याकडून 
काहीही झालं तरी हवंय फक्त तुझं असणं 
तू नसलीस जर आयुष्यात माझ्या 
तर नेहमीच खात राहील मला तुझं नसणं...

तू आहेस तर सगळं असल्यासारखं वाटतं 
तुला नाही माहित किती महत्वाचं आहे तुझं असणं 
तुझ्या असण्याने माझं आयुष्य पूर्ण आहे 
तू नसशील तर ते नेहमीच राहील अपूर्ण...

रुप अनं शरीर बघून नाही पडलो प्रेमात 
तुझं मन च आहे तसं प्रामाणिक अनं देखणं 
हसणं तर तुझं फार च आवडतं मला 
पण त्याहूनही आवडतं मला तुझं माझ्यापुढे हक्काने रुसणं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस
फार महत्वाचं आहे माझ्यासाठी 
तुझं माझ्या आयुष्यात असणं 
तुझ्यासोबत असताना आवडतं मला 
तुझं हसणं तुझं रुसणं तुझं लाजणं...

फार काही अपेक्षा नाहीत मला तुझ्याकडून 
काहीही झालं तरी हवंय फक्त तुझं असणं 
तू नसलीस जर आयुष्यात माझ्या 
तर नेहमीच खात राहील मला तुझं नसणं...

तू आहेस तर सगळं असल्यासारखं वाटतं 
तुला नाही माहित किती महत्वाचं आहे तुझं असणं 
तुझ्या असण्याने माझं आयुष्य पूर्ण आहे 
तू नसशील तर ते नेहमीच राहील अपूर्ण...

रुप अनं शरीर बघून नाही पडलो प्रेमात 
तुझं मन च आहे तसं प्रामाणिक अनं देखणं 
हसणं तर तुझं फार च आवडतं मला 
पण त्याहूनही आवडतं मला तुझं माझ्यापुढे हक्काने रुसणं....

©अश्लेष माडे (प्रीत कवी )  मराठी प्रेम स्टेटस फक्त तुझ्यासाठी लव्ह स्टेटस मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस