विवंचनेचे डंख हजारो चाळण करती रोज मनाची उपरती ना होई मनुजा झडून गेल्या आर्त क्षणाची.. अथांग,अविरत लहरे सागर थेंब एक तू पृथा अनामिक अस्तित्वाचा किती बढाया कल्पित, रंजीत अती भावनिक.. ओसरलेला गडद गहिरा इंद्रधनुचा फिका पिसारा शापीत भवती गंधर्वाचे रुदन चालले कोण सहारा? कसा टळेना पाठलाग हा? सावज पारध कोण कळेना? वाट निसरडी पाय रुतले चुकलेली लय पुन्हा जुळेना.. पेरून फासे क्रूर नियतीने जर्रजर्र केले पुरते आता हरवलेली ऊब कुशीची कोण आता कुरवाळील माथा? ©Shankar Kamble #SunSet #जीवन #जीवनअनुभव #जीवनदर्शन #जगणे #दुःख #सुख #मी #अनामिक #दर्पण