Nojoto: Largest Storytelling Platform

सालं, आयुष्याचं गणितच बिघडलं राव बेरीज करता करता

सालं, आयुष्याचं गणितच
बिघडलं राव 
बेरीज करता करता
वजा च होत गेलं राव ।।

सुख भागाकरात जाऊन
दुःख गुणाकारात आलं
समजलच नाही हे 
कधी झालं ।।

पायथागोरस ला 
पण बोलवून बघितलं
अस्ताव्यस्त असलेले कर्ण,
पाय बघून, त्याने हात वर गेलं ।।

म्हणलं बघावं तरी किती
क्षेत्रफळ आपल्या दुःखाचे
पण मला नावच सांगता
येईना, आकाराचे ।।

बे दुणे चार होतात पण 
माझे बे दुणे शून्य च राहताय
आणि एक अधिक एक
ही शून्य च होताय ।।

खरच आयुष्याचं सारं
गणितच चुकलं यार 
बाकीत काही ना काही
दुःख च उरतय फार ।। #आयुष्यची #गणितकविता #चुकलेले  #मराठीकविता
सालं, आयुष्याचं गणितच
बिघडलं राव 
बेरीज करता करता
वजा च होत गेलं राव ।।

सुख भागाकरात जाऊन
दुःख गुणाकारात आलं
समजलच नाही हे 
कधी झालं ।।

पायथागोरस ला 
पण बोलवून बघितलं
अस्ताव्यस्त असलेले कर्ण,
पाय बघून, त्याने हात वर गेलं ।।

म्हणलं बघावं तरी किती
क्षेत्रफळ आपल्या दुःखाचे
पण मला नावच सांगता
येईना, आकाराचे ।।

बे दुणे चार होतात पण 
माझे बे दुणे शून्य च राहताय
आणि एक अधिक एक
ही शून्य च होताय ।।

खरच आयुष्याचं सारं
गणितच चुकलं यार 
बाकीत काही ना काही
दुःख च उरतय फार ।। #आयुष्यची #गणितकविता #चुकलेले  #मराठीकविता
poojashyammore5208

pooja d

New Creator