Nojoto: Largest Storytelling Platform

काहीतरी लिहावंसं वाटलं......!😍 खूप काही लिहायचं

काहीतरी लिहावंसं वाटलं......!😍

खूप काही लिहायचं होत
पण नेमका विषयचं सापडेना,
शांत मिटले नयन तरी
डोळ्यासमोरील काळोख मिटेना.
उदास, बैचेन, एकटं मन
असंख्य विचारांच्या जाळ्यात अडकलं,
कितीतरी दिवसांनी आज
काहीतरी लिहावंसं वाटलं.......😍

कोणावर ? कश्यासाठी ? आणि का लिहू ?
याचचं प्रश्नचिन्ह समोर दिसत होतं,
पण काहीतरी नवीनच लिहू
अस मात्र सारखं वाटायचं.
घेतला कागद आणि काढली लेखनी
अक्षरांनीही शब्दाचं घर गाठलं,
का ? कुणास ठाऊक ? पण
आज काहीतरी लिहावंसं वाटलं......😍

क्षणिक सुखावर की
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या दुःखावर लिहावं,
हरवलेल्या माणसातल्या माणुसकीपणावर की
पिसाळलेल्या जनावरांकड पहावं.
प्रेम , मैत्री , कुटुंब की आणखी काही
अनेक विचारांचं घरटं मनी साठलं,
विषयाच्या चक्रव्यूहात अडकलो खरा
पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं....,😍

अबोल मनाचे झाकलेले दरवाजे
कधीतरी उघडावेच लागतील,
समजुतीनेच शब्दांचे सामर्थ्य शब्दानीच मांडावे
तेच काहीतरी मार्ग दाखवतील.
झाडांचं दुःख मांडाव तर 
आत्महतेने शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं.
कुठून तरी सुरुवात व्हावी म्हणून
आज काहितरी लिहावंसं वाटलं.....😊

फक्त लिहीत चालतो होतो
कश्यावर लिहतोय कळतच नव्हतं,
हाताचा वेग आणि पेनाच्या शाईने
कागदावर मात्र कवितेचं ठस उमटलं.
वाटलं होत मनाचं ओझं कवितेद्वारे हलकं करू
पण मनी विषयाचं बारीक धुकं दाटलं,
काही खास लिहलं नव्हतं पण
कितीतरी दिवसांनी लिहल्याचं समाधान नक्की वाटलं..😍

                                  Pandhari Varpe Xyz
काहीतरी लिहावंसं वाटलं......!😍

खूप काही लिहायचं होत
पण नेमका विषयचं सापडेना,
शांत मिटले नयन तरी
डोळ्यासमोरील काळोख मिटेना.
उदास, बैचेन, एकटं मन
असंख्य विचारांच्या जाळ्यात अडकलं,
कितीतरी दिवसांनी आज
काहीतरी लिहावंसं वाटलं.......😍

कोणावर ? कश्यासाठी ? आणि का लिहू ?
याचचं प्रश्नचिन्ह समोर दिसत होतं,
पण काहीतरी नवीनच लिहू
अस मात्र सारखं वाटायचं.
घेतला कागद आणि काढली लेखनी
अक्षरांनीही शब्दाचं घर गाठलं,
का ? कुणास ठाऊक ? पण
आज काहीतरी लिहावंसं वाटलं......😍

क्षणिक सुखावर की
हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या दुःखावर लिहावं,
हरवलेल्या माणसातल्या माणुसकीपणावर की
पिसाळलेल्या जनावरांकड पहावं.
प्रेम , मैत्री , कुटुंब की आणखी काही
अनेक विचारांचं घरटं मनी साठलं,
विषयाच्या चक्रव्यूहात अडकलो खरा
पण आज काहीतरी लिहावंसं वाटलं....,😍

अबोल मनाचे झाकलेले दरवाजे
कधीतरी उघडावेच लागतील,
समजुतीनेच शब्दांचे सामर्थ्य शब्दानीच मांडावे
तेच काहीतरी मार्ग दाखवतील.
झाडांचं दुःख मांडाव तर 
आत्महतेने शेतकऱ्यांचं आभाळ फाटलं.
कुठून तरी सुरुवात व्हावी म्हणून
आज काहितरी लिहावंसं वाटलं.....😊

फक्त लिहीत चालतो होतो
कश्यावर लिहतोय कळतच नव्हतं,
हाताचा वेग आणि पेनाच्या शाईने
कागदावर मात्र कवितेचं ठस उमटलं.
वाटलं होत मनाचं ओझं कवितेद्वारे हलकं करू
पण मनी विषयाचं बारीक धुकं दाटलं,
काही खास लिहलं नव्हतं पण
कितीतरी दिवसांनी लिहल्याचं समाधान नक्की वाटलं..😍

                                  Pandhari Varpe Xyz