Nojoto: Largest Storytelling Platform

#तुझे अस्तित्व.... अशाच एका कातरवेळी सखे अनाहुतपणे

#तुझे अस्तित्व....
अशाच एका कातरवेळी सखे अनाहुतपणे विसावलो मिठीत तुझ्या
क्षण ओझरते ते सुखाचे तेव्हा मी अनुभवले संगतीने तुझ्या
सोनसळी सुगंधी वर्षावात या केशरी रवी किरणांच्या
प्रेम आपुले हे फुलावे किनारी त्या स्वप्नंक्षितिजाच्या
साथ तुझी हवी मज ह्या वेदनेच्या वर्षावात असलेल्या ओल्या सांजवेळी 
अनुभूती ती घ्यावी मग आपसुक मीही ह्या स्वर्गमय सुखाची
हात तुझा हाती हवा मज मग नको आधार तो दुजेपणाचा
माझा शिनभार करी मी हलका बाहुवरी तुझ्या माझ्या आत्मक्लेषांचा
अस्तित्वात माझिया सदा फुले ध्सास तुझ्या आयुष्याचा सप्तरंगांचा
काय हवे मज आता तू तर विश्व होई माझे
तुझ्यात गुंतलेला हा श्वास नको सोडवू कधी अन्
कधीच नको तोडु हे मजभोवतीचे आत्मबंधन तुझे
@शब्दवेडा किशोर

©शब्दवेडा किशोर #तुझे_अस्तित्व